शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव-भीमा दंगलीत मराठा संघटना : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:59 IST

सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगल मराठा समाजातील काही संघटनांनीच भडकवली, असा गौप्यस्फोट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देदंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करणार

सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगल मराठा समाजातील काही संघटनांनीच भडकवली, असा गौप्यस्फोट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. या दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव ते पेरणे फाट्यादरम्यान अज्ञातांकडून वाहनांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत चाळीसवर वाहनांचे नुकसान झाले. या परिस्थितीमुळे महामार्गालगतची गावे बंद ठेवण्यात आली होती. दगडफेकीनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते. या दंगलीतून मराठा आणि दलित समाजातील दरी वाढवून आपली पोळी भाजून घेण्याचा काही संघटनांचा हेतू होता. परिस्थिती लक्षात घेतल्यास या दंगलीमागे काही मराठा समाजातील संघटनांचाच हात होता, असे दिसत आहे. हे जरी खरे असले तरी, दंगलीनंतर दि. २ आणि ३ जानेवारीला मराठा आणि दलित समाजातील वाद संपविण्यासाठीही मराठा समाजातील काही सामाजिक काम करणाºया पदाधिकारी आणि पोलिसांनीच मध्यस्थी केली. यामुळे दोन्ही समाजातील वाद निवळला आहे.महाराष्ट्राच्या भल्यासाठी मराठा-दलित वाद परवडणार नसल्यामुळे दोन्ही समाजांनी गुण्यागोविंदाने एकत्रित राहिले पाहिजे. दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.3प्रकाश आंबेडकर तमाशातील राजाकोरेगाव-भीमा दंगलीमध्ये दलित समाजावर अन्याय झाला. या संतापातूनच समाज रस्त्यावर उतरला होता. मी मंत्री असल्यामुळे महाराष्ट्र बंदची हाक देऊ शकत नव्हतो. याचा गैरफायदा घेऊन प्रकाश आंबेडकर यांनी लगेच बंदची हाक दिली. राज्यभरातून त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. प्रकाश आंबेडकर तमाशातील राजा झाल्याप्रमाणे वागत होते. एका दिवसात राजा होत नाही. समाजाने केलेल्या आंदोलनाचे श्रेय घेणे चुकीचे आहे. या आंदोलनात बहुतांशी माझेच कार्यकर्ते होते, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.उध्दव ठाकरे यांची नाराजी नरेंद्र मोदी, अमित शहापर्यंत पोहोचविलीकेंद्र आणि राज्यात २०१९ मध्ये होणाºया निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपची युती कायम राहणार आहे. मित्रपक्षांना बरोबर घेतल्याशिवाय सत्ता टिकविता येत नाही. शिवसेनेला केंद्रात आणखी एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याची गरज असतानाही भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची ही नाराजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचविली आहे. ते महिन्याभरात ठाकरे यांची नाराजी दूर करून भविष्यात भाजपबरोबर युती ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. माझा त्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे आठवले यांनी संगितले.नीरव मोदीच्या मुसक्या आवळणारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळेबहाद्दर उद्योगपती नीरव मोदी याचा काहीएक संबंध नाही. नीरव मोदीच्या मुसक्या आवळून आम्ही बँकेतील घोटाळ्यामधील सर्व पैसे वसूल करणार आहे. भ्रष्टाचारी मंडळींना आमचे सरकार कधीच पाठीशी घालत नाही. बँकांनीही बड्या कर्जदारांना कर्जपुरवठा करताना काही आचारसंहिता घालून घेतल्या पाहिजेत. यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. बड्यांना बँका लगेच कर्ज देतात आणि छोट्यांना कर्जपुरवठा करीत नसल्याबद्दलही रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली.